औरंगाबाद- दिवाळीच्या सुट्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना आठ दिवसातच जेरबंद करुन पोलिसांनी ११ तोळे सोने जप्त केले आहे. शहरातील सिडको एन-६ या परिसरात दिवाळीच्या सुट्यांमध्ये चोरट्यांनी भरदिवसा धाडसी घरफोडी केली होती. या घरफोडीत तब्बल ११ तोळे सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत..
ही कार्यवाही पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस उप-आयुक्त डॉ. राहुल खाडे,
सहाय्यक पोलिस आयुक्त सिडको विभाग गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भरत पाचोळे, महिला पोलिस उप निरीक्षक
पुनम पाटील, नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी,
किशोर गाढे व विशेष पोलिस अधिकारी विजय तुपे, साळोबा जाधव यांनी केली.












